तंत्रज्ञानामुळे विकासाला गती
- भारत सरकारच्या सचिवा व अॅटॉमिक एनर्जी कमिशनच्या सदस्या डॉ. सुधा कृष्णन
पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील नागरिकांनी स्पर्धेच्या युगात वावरत असताना नवनवीन आव्हाने स्विकारणे गरजेचे आहे. आकृतीच्या नवीन केंद्रासाठी झालेली प्रचंड गर्दी पाहून ग्रामीण भागात देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात आहे हे स्पष्ठ होत असताना पाणी, बियाणे यांची तपासणी छोटया कीटच्या सहाय्याने स्वतः करणे शक्य झाले आहे. त्यामुळे येथील विकासाला गती मिळत आहे.’ असे प्रतिपादन भारत सरकारच्या सचिवा व फायनान्स, अॅटॉमिक एनर्जी आणि स्पेस कमिशनच्या सदस्या डॉ. सुधा कृष्णन यांनी व्यक्त केले.

रोपळे (ता. पंढरपूर) मध्ये उद्योजक परमेश्वर माळी यांच्या ‘पी.एम.रोपळे टेक्नोकन्सल्टन्स (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेडच्या आकृती रोपळे केंद्राच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सचिवा डॉ. कृष्णन बोलत होत्या. प्रारंभी भाभा अनु संशोधन केंद्र अंतर्गत असलेल्या आकृती सेन्टरच्या प्रमुख डॉ. स्मिता मुळे यांनी आकृती, कृती आणि फोर्स म्हणजे नेमके काय? हे सांगून सेंटर बद्धल सविस्तर माहिती दिली. परमेश्वर माळी यांनी शास्त्रज्ञ,अधिकारी, स्वेरीचे प्राध्यापकवर्ग व ग्रामस्थ सर्वांचे स्वागत करून ‘रोपळेकरांमुळेच मी अभियंता झालो आणि आता याच ग्रामस्थांच्या सहकार्याने मी यशस्वी वाटचाल करत असताना ग्रामीण भागासाठी माझे अधिकाधिक योगदान राहील, यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. पी.एम.आकृती सेंटरमध्ये सुरवातीला पाणी शुद्धीकरण संयंत्र आणि माती परीक्षणासाठी माफक किमतीत किट उपलब्ध आहेत. मात्र भविष्यात अल्ट्रा फिल्टरेषण फिल्टर, फोल्डेबल सोलार ड्रायर आदी योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. निशिगंधा माळी म्हणाल्या की, ‘एखाद्या सामान्य मुलाने तंत्रज्ञान विकसित केले तर त्याच्यासाठी मोठ-मोठ्या पदावरील अधिकारी या ठिकाणी आवर्जून येतात. कारण दुध, तुपासारख्या गोष्टी विकण्यासाठी दारोदार जावे लागते. यासाठी प्रथम चांगली गोष्ट ग्रामस्थांना पटवून देण्यासाठी अत्यंत मेहनत घ्यावी लागते. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षित करणे गरजेचे आहे.त्यानंतर त्यांना प्रचंड मेहनत घेवून तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी लागणार आहे. तरच तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात खोलवर रुजेल.’ स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘तंत्रज्ञानाशिवाय विकास अशक्य आहे. परमेश्वर माळी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे रोपळेमध्ये आकृती केंद्र निर्माण झाले असून याचा फायदा येथील ग्रामस्थांना होणार आहे. तंत्रज्ञान माहित होण्यास वेळ लागेल परंतु याचे फळ उशिरा का होयीना मात्र चांगलेच असणार आहे.’असे सांगून स्वेरीतील संशोधन विभागाची माहिती दिली. यावेळी केंद्र सरकारच्या स्कील इंडियाचे सचिव डॉ. के.पी.कृष्णन, डॉ. अजय शहा, माजी सरपंच नागनाथ माळी, उपसरपंच गणेश भोसले, रयतचे बाळासाहेब पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, मधुकर गुंजाळ, बागायतदार पोपट भोसले, स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, सौ. पल्लवी माळी, आऊटरिच सेंटरचे गजेंद्र कुलकर्णी, संशोधन अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे, कार्यकारी अधिकारी समाधान लोखंडे, माजी सरपंच नागनाथ माळी यांच्या सह सुमारे दोन हजार ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. व्ही. एस. क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले तर सरपंच दिनकर कदम यांनी आभार मानले.
0 Comments