12 व्या शतकामध्ये जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख निर्माण करुन देणार्या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आजही आपल्या देशाला गरज आहे. असे विचार जि.प. सदस्या शैलाताई गोडसे यांनी व्यक्त केले. आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महात्मा बसवेश्वरांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. महात्मा बसवेश्वरांनी चातुवर्णाला विरोध केला. वर्णभेद, जातीभेद नुसतेच नाकारले नाही तर त्यावर त्यांनी सडकून टीकाही केली. भारतीय समाज विशेष करून दक्षिण भागातील समाज हा अनेक परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्त्री दास्यत्व, जातीयता इत्यादींनी त्रस्त झालेला, मरगळलेला होता. अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी केले. मान, अपमान, कष्ट, टीका सहन करीत त्यांनी प्रस्थापितां विरुद्ध मोठा संघर्ष उभा केला. असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला शैलाताई गोडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे, समाजसेवक ओंकार बसवंती, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख सौ.आरतीताई बसवंती, अर्चना भालेराव, युनिक सायंन्स क्लासेसचे यशवंत वाघ सर, विवेक पवार सर, आदित्य अलाट सर आदी उपस्थित होते.
या मान्यवरांनीही केले अभिवादन


नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, व्यापारी कमिटीचे चेअरमन धीरज म्हमाणे, युवराज मुचलंबे, देगाव ग्रामपंचायत सदस्य आण्णा वायदंडे, शरद गाडगिळ, एशियन मार्शल आर्टस चे ऑर्गनायझर आणि कोच विकास घोडके सर, काळे, सचिन वरपे आदी मान्यवरांनीही पंढरपूर लाईव्ह कार्यालयात येवुन महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.




0 Comments