दिनांक 8 -5 -2019 रोजी रोजी सौ. अश्विनी खाडे, रा. तिरंगा नगर पंढरपूर या महिला भाविकांची रोख रक्कम रुपये 29,900 व सोनेचे दागिणे असलेली पर्स मंदिर परिसरात विसरली होती; परंतु मंदिर परिसरातील पेट्रोलिंग ड्युटीवर असणार्या कमांडोंनी ही पर्स प्रामाणिकपणे परत करत आपले कर्तव्य चोख बजावले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रल्हाद महाराज मंदिर जवळील कट्ट्यावर विसरलेली ही पर्स मंदिर परिसरात पेट्रोलिंग ड्युटीवर असणारे रेस्क्यू फोर्स चे कमांडो श्री सोमनाथ मोरे यांना मिळाली होती. ती त्यांनी सदर महिला भाविकाला इमानदारीने परत केली. त्याबद्दल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. सचिन ढोले यांच्या हस्ते कमांडो चा सत्कार करण्यात आला. यावेळी एपीआय गालिंदे साहेब, पोलीस नाईक वामन यलमार, दीपक शिंदे व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते. श्री.मोरे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





0 Comments