पंढरपूर । प्रतिनिधी,
कु.सायली समीर कुलकर्णी हिने इयत्ता 4 थीमध्ये राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत पंढरपूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच राज्यस्तरीय बुध्दीवंत प्रज्ञाशोध परीक्षेत पंढरपूर केंद्रात तिसरा क्रमांक मिळविला आहे.
तिच्या या यशाबद्दल आदर्श बाल व प्राथमिक मंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माया सांगोलकर, शाखा प्रमुख सौ.जयश्री उत्पात, वर्गशिक्षिका सौ.आशा पाटील व इतर सहकारी शिक्षिकांनी अभिनंदन केले. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच तिला अभ्यासासाठी आई व वडिलांचे सहकार्य लाभले.





0 Comments