पंढरपूर (प्रतिनिधी) शिलाँग, मेघालय मधील मार्टिन ल्युथर ख्रिस्ती अन युनिव्हर्सिटी मध्ये फोल्डस्कोप या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
दि.२४ नोव्हेंबर रोजी एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर च्या वतीने फूड आणि न्यूट्रिशन, मेडिकल लॅब टेक्निशियन, हेल्थ सायन्स या विभागाच्या ४०-४५ विद्यार्थिनी या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. प्रोजेक्टवर काम करणारे ज्युनियर रीसर्च फेलो विजय वैशंपायन यांनी फोल्डस्कोप कसा बनवायचा आणि त्याचे अँप्लिकेशन यावर मार्गदर्शन केले. डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी फोल्डस्कोपच्या फायद्यांबद्दल अधिक विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.

दि. २६ नोव्हेंबर रोजी जोवई येथील स्थानिक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जोवईच्या जिल्हा कृषी अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात पडणाऱ्या किडीचे निरीक्षण फोल्डस्कोप च्या साहाय्याने कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
या कार्ययशाळेसाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले असुन फोल्डस्कोप पेपरचा मायक्रोस्कोप असून त्याला १४० पट विस्तृतिकरणाची क्षमता आहे. प्रयोग शाळेेत जलद गतीने तपासणीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो असे या कार्ययशाळेत मार्गदर्शन करताना तज्ञांनी सांगितले.




0 Comments