परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात सध्या भिषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांना आज पाण्यासाठी पशुधनासाठी चारा, हाताला काम नाही अशा सद्या स्थितीमध्ये मा.जिल्हाधिकारी यांनी प्रशासनातील ज्या कर्मचाऱ्यांना गावस्तरावर नियुक्त्या दिल्या आहेत. त्याठिकाणी मुक्कामी राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावेत अन्यथा विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे केला आहे.

बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थितीला हा जिल्हा सामोरे जात आहे. जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे. छोटे-मोठे तलाव पूर्णत: आटले आहेत. विहिरी, बोअर सुके पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यातल्या वाडी-वस्ती-तांड्यावरील आणि गावागावांतील लोकांना पायपिट करावी लागत आहे. एवढी भयावह स्थिती असतानाही जिल्ह्यातील प्रशासन मात्र दुष्काळावर कानाडोळा करत आहेत. जिल्ह्यात टँकरचा आकडा हजारावर जाऊन पोहचल्याचे सांगितले जाते, मात्र गावागावांतून टँकर खेपा करत नसल्याच्या ओरड येत आहेत. याकडे शासन आणि प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळे पाण्याची टंचाई अधिकच भेडसावत आहे. पाणीप्रश्नामुळे गावागावांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे प्रश्न गावातच सुटवेत म्हणून दुष्काळात होरपळत चालेल्या सामान्य शेतकरी, कामगार मजूर यांच्या मदतीसाठी दैनंदिन जिवनात आवश्यक असलेले आरोग्य कर्मचारी, पशुवैद्यकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, लाईनमन, कृषि सहायक व इतर कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर मुक्कामी राहून दुष्काळातील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबाबत मा.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्यधिकारी यांनी ज्या गावात गावस्तरावर पदभार दिलेला आहे. त्याच गावात मुक्कामी थांबावे व जनतेच्या अडीअडचणीचे प्रश्न व इतर कामे सोडवण्यास प्राधान्य घावे. असे जो कर्मचारी गावात मुक्कामी नसेल, गैरहजर असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी दिला आहे.




0 Comments