मोदी त्सुनामी... अधिकृत आकडेवारीनुसार 303 जागांवर भाजपाची आघाडी

देशामध्ये मोदींची लाट नव्हे तर यावेळी मोदी त्सुनामी आली असल्याचा डंका देशभर वाजत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपने 303 जागांवर आघाडी घेतली आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ 50 जागांवर आघाडी आहे. निकालाच्या आधी जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तोच अंदाज खरा ठरेल अशा पद्धतीने कल येत आहेत. 2014 मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता मोदींनी पुन्हा एकदा असाच विजय मिळवला आहे. देशातील जनतेने 1984 नंतर एखाद्या पक्षाला प्रथमच इतके मोठे यश मिळवले आहे. 84 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना जनतेने मोठा कौल दिला होता.
निकालाच्या आधी जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 5 वाजेपर्यंत भाजपने 303 आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 50 जागांवर आघाडी घेतली आहे. या दोन्ही पक्षानंतर शिवसेनाने 18 जागांवर आघाडी घेतली आहे.
खालीलप्रमाणे आहेत कल...
भाजप-303
काँग्रेस- 50
शिवसेना-18
वायएसआर काँग्रेस- 22
डीएमके- 23
तृणमूल काँग्रेस- 22
बसपा-10
543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी 11 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यातील 95 जागांवर 18 एप्रिल रोजी, 23 एप्रिल रोजी 15 राज्यातील 117 मतदारसंघात, चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 9 राज्यातील 71 जागांवर, 6 मे रोजी पाचव्या टप्प्यात 7 राज्यातील 51 मतदारसंघात, सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी 7 राज्यात 59 जागांवर तर अखेरच्या टप्प्यात 19 मे रोजी 8 राज्यातील 59 मतदारसंघात मतदान झाले होते.








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments