लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पराभव स्विकारल्यानंतर राहुल गांधींनी पहिली पत्रकार परिषदेत घेतली. त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचे अभिनंदन केले. जनतेने दिलेल्या कौल आम्हाला मान्य आहे असेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी अमेठीतून स्मृती इराणी यांचा विजय झाला अशी घोषणाही केली व आपला पराभव मान्य केला. दरम्यान अधिकृत निकाल जाहीर झाला नसला तरी, राहुल गांधींनी आपला पराभव मान्य केला आहे. तसेच, अमेठीच्या मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो, असेही राहुल गांधी म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपने 301 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळं भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. या रेकॉर्डब्रेक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दसबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत, असे ट्विट केले आहे. 2014मध्ये आलेल्या मोदी लाटेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ 51 जागांवर आघाडी आहे. निकालाच्या आधी जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तोच अंदाज खरा ठरेल अशा पद्धतीने कल येत आहेत.

0 Comments