पंढरपूर: लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून उत्साही कार्यकर्त्यांमध्ये नानाविध प्रकारच्या पैजा लागल्याचे समोर आले अशीच एक पैज हरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आपल्या मिशा काढाव्या लागल्या...
किस्सा गमतीशीर आहे. पंढरपूर तालुक्यातील पळशी गावच्या औदुंबर चव्हाण आणि शुभम फटे या दोघांमध्ये शर्यत लागली....
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे संजयमामा शिंदे आणि शिवसेना-भाजपचे रणजित निंबाळकर यांच्या कडवी लढत होती.
चव्हाण हे राष्ट्रवादीच्या संजयमामा यांचे समर्थक तर फटे हे युतीचे, पैज होती आपल्या पक्षाचा उमेदवार हरला तर मिशी काढायची!
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि माढयातून युतीचे उमेदवार निंबाळकर हे विजयी झाले.
निंबाळकर विजयी झाल्याने युतीचे समर्थक फटे हे पैज जिंकले आणि चव्हाण हे शर्यत हरले.
लावलेल्या पैजे प्रमाणे आज चव्हाण यांनी सलूनचे दुकान गाठून आपली मिशी भादरून घेतली...
या पैजेमध्ये सचिन माळी आणि समाधान माळी यांनी साक्षीदारांची भूमिका पार पडली.






0 Comments