स्वेरीच्या विद्यार्थ्याची परदेशी कंपनीत निवड


प्लेसमेंटचा झंझावात कायम
पंढरपूर- मोठ्या पॅकेजमुळे अनेकजण अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर इतर जॉबच्या शोधार्थ इतर पर्याय न पाहता थेट मोठमोठ्या उद्योगांकडे अर्थात कंपनीकडे वळतात आणि कंपनी देखील गुणवत्तापूर्ण उमेदवारांचाच कंपनीसाठी स्विकार करते.आज काल कंपनीची गुणवत्ता वाढविण्यासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी मिळविणे कठीण झाले असून विद्यार्थी निवडताना कंपनी प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता जर कंपनीत जास्त कालावधी एखादा उमेदवार राहिला तर तो कदाचित स्वेरीचाच असतो असे बोलले जाते. त्याचे कारण म्हणजे  कंपनीसाठी स्वेरीने विशेष प्रशिक्षण देवून पात्र विद्यार्थी तयार केले जात आहे. त्यामुळे साधारण गेल्या चार वर्षातील कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची आकडेवारी काढल्यास स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांनी आघाडी मारल्याचे दिसून येते. आता हेच विद्यार्थी सातासमुद्रपार जावून परदेशातील कंपनीत आपले करिअर घडवीत आहेत.


मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘ग्रेटविन्’ या दुबईमधील कंपनीत स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील वैभव पवार यांची निवड करण्यात आली असून तेथे स्वेरीचे माजी विद्यार्थी प्रशांत चांगण यांनीच कंपनी स्थापित केली असून स्वेरीचा झेंडा आता वैभव पवारच्या निमित्ताने सात समुद्रापार डौलाने मिरवीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी कंपनीने सहा लाखांचे वार्षिक पॅकेज वैभव पवार याना देवू केले असून इतर सोयी सुविधा देखील उपलब्ध असल्याचे कंपनीचे प्रमुख चांगण यानी सांगितले. वैभव पवार यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे तसेच विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ, प्रा. डी.ए. कुंभार, प्रा.एस.व्ही.दर्शने, विभागप्रमुख प्रा. सचिन गवळी, प्रा. सचिन खोमणे, प्रा. विक्रम चव्हाण आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे. दुबईत निवड झाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी वैभव पवार यांचे अभिनंदन केले.  




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments