पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३६ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रास्तविकात स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम पवार यांनी स्वातंत्रवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून दिली. विश्व हिंदु परिषदेचे रवींद्र साळे यांच्या हस्ते स्वातंत्रवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन केले.
त्यांनी सावरकरांच्या जीवनातील महत्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांच्या सोबत बापू भोळे, डॉ. जयसिंह पाटील, स्वेरीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, वर्कशॉप इन्चार्ज प्रा. बी. डी. गायकवाड, ग्रंथालय प्रमुख प्रा. एस. एम. बागल, प्रा. एस. व्ही. दर्शने, इलेकट्रीकल सुपर वायजर संतोष जाधव, प्राध्यापकवर्ग व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.





0 Comments