पंढरपूर - श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुल अॅन्ड ज्युनियर कॉलेज (स्टेट बोर्ड) च्या फेब्रुवारी २०१९ या परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कु.वैष्णवी शरदकुमार देशमुख हिने ७०.१५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कु. साक्षी सुजित उबाळे हिने ६७.६९ टाके गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कु. यशवंत सिद्धेश्वर माळी याने ६५.५३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला असल्याची माहिती कॅम्पसच्या प्रमुख डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली.
महाविद्यालयामध्ये घेण्यात येणाऱ्या प्रॅक्टीस सेशन, अभ्यासक्रमाचे नियोजन, सराव परिक्षा, विद्यार्थी विकास कार्यक्रम, नाईट स्टडीचे नियोजन, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे नियोजनबध्द वेळापत्रक, शिस्त व वैयक्तिक मार्गदर्शन आणि संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या ‘पंढरपूर पॅटर्न इन सेकंडरी स्कूल एज्युकेशन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांच्या मार्गदर्शनामुळे ज्यु. कॉलेजचा वार्षिक निकाल उत्कृष्ठ लागला. ग्रामीण व शहरी भागात अधिक लोकप्रिय झालेल्या या ज्युनियर कॉलेजची ही पहिली बॅच असल्यामुळे निकालाची उत्सुकता लागली होती. लोटस इंग्लिश स्कूल प्रमाणेच अल्पावधीत लोटस ज्यु.कॉलेजने पण आपल्या यशाचे ठसे स्पर्धेच्या युगात उमटवले आहेत. संस्थेचे विदयमान अध्यक्ष भिमराव रोंगे, उपाध्यक्ष हणुमंत बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे सचिव डॉ. बी. पी. रोंगे व संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, वर्गशिक्षक ज्ञानेश्वर वायदंडे व सौ. भाग्यश्री मठपती, कॅम्पस प्रमुख डॉ. जयश्री चव्हाण, पालकवर्ग, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.





0 Comments