प्रतिनिधी/पंढरपुर
पुणे येथील सिंहगड मॅनेजमेंट कॉलेजच्या अल्युमिनाय मिट २०१९ या कार्यक्रमामध्ये पंढरपुर येथील निर्माता व दिगदर्शक सचिन धोत्रे,सतनाम फिल्मस निर्मित "परकिया" या चित्रपटाच्या टिमचा सत्कार सिंहगड मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्या डॉ.अनामिका सिंग यांनी केला.यावेळी दिगदर्शक सचिन धोत्रे,नायक चेतनकुमार लमाण,नायिका रूचिका शिवशरण,नृत्यांगणा अपेक्षा चव्हाण,करण अनपट,सिद्धांत भालेराव,साजिद शेख,राहुल पवार उपस्थित होते.
आजच्या काळात ग्रामीण भागातील तरूण कलावंताचं मराठी चित्रपटात मोठं योगदान असुन यांना योग्य दिशा देण्याचे काम सचिन धोत्रे यांनी केले असल्याचे डॉ.अनामिका सिंग यांनी सांगितले.तसेच चित्रिकरणाच्या वेळी आलेला अनुभव व विविध गंमती नायिका रूचिका शिवशरण व नृत्यांगणा अपेक्षा चव्हाण यांनी सांगितल्या.उसळत्या प्रेमाचा अदभूत पूर्ण अनुभव असलेला "परकिया"हा मराठी चित्रपट येत्या १४ जुनला प्रदर्शित होणार असल्याची माहीती दिगदर्शक सचिन धोत्रे यांनी दिली.या कार्यक्रमाचे आयोजन सिंडगड मॅनेजमेंटचे प्राध्यापक डॉ.अशितोष गाडेकर,प्रा.पुजा अप्राजित , प्रा.मंगेश सानप,प्रा.शिल्पा भिंगारदिवे,प्रा.सिमा चौरे,प्रा.मनोज कुलकर्णी,प्रा.अमित देशमुख यांनी केले.
0 Comments