स्वेरीच्या विद्यार्थ्यांची कंपन्यामध्ये निवड... जादा पॅकेजमुळे विद्यार्थ्यांचा कंपन्यांकडे अधिक कल


पंढरपूरः- यार्डी, एल अॅण्ड टी इन्फोटेक आणि अॅक्टी सिस्टम्स या तीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून याचे वार्षिक पॅकेज अनुक्रमे रु.४.५ लाख, रु.३.५ लाख व रु.२.५ लाख अशी आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
         सॉफ्ट्वेअर,आय. टी.व फायनान्स क्षेत्राशी निगडीत असलेल्या यार्डी, एल अॅण्ड टी इन्फोटेक आणि अॅक्टी सिस्टम्स’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन कंपनीचे प्रमुख एच आर. अनुक्रमे सचिन टाकळकर, तरुण शाह व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्याकॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे दीपन्विता देब यांची यार्डी कंपनीत, पृथ्वीराज पवार यांची एल अॅण्ड टी इन्फोटेकमध्ये तर रोहित कोंडे यांची निवडअॅक्टी सिस्टम्समध्ये से मिळून तीन विद्यार्थ्यांची या कंपनीसाठी निवड झाली आहे.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments