जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती बसवेश्वर चौक नवी पेठ पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री संत दामाजी सह. साखर कारखान्याचे चेअरमन समाधान दादा अावताडे यांच्या वतीने मार्केट कमिटीचे माजी सभापती विष्णुपंत अवताडे यांनी केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश सदाशिव स्वामी यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी समाजभूषण मा. श्री. नंदकुमार बाळासो डोंबे, नगरसेविका श्वेताताई डोंबे, कृष्णाताई आंबरे, नगरसेवक विवेक परदेशी, लखन चौगुले, डॉ. अरुण मेनकुदळे, सिताराम शुगर्सचे चेअरमन श्री. गणेश ठिगळे, विठ्ठल सह. साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले, दामाजी शुगर चे संचालक भारत निकम, अविनाश मोरे बालम मुलाणी, विनोद लटके, पिंटू पंतोजी, सुरज पावले आदी मान्यवर तसेच पंढरपुर नगरी मधील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.



0 Comments