पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्रा मिनाक्षी मुकुंद पवार यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिटयुट ऑफ इंजिनिअरिंग, नांदेड या अभियांत्रिकीमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या ‘कॉम्प्यूटर एडेड अनॅलिसिस ऑफ मॅमोग्राम्स फॉर ब्रेस्ट डिसीजेस’ विषयात पी.एच. डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोध निबंध एस.जी. जी. एस.आय.ई. अँन्ड टी. व एस. आर. टी.एम.यु, नांदेड विद्यापीठामध्ये सादर केला होता. त्यांच्या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी पी.एचडी. प्राप्त केल्यामुळे महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.




0 Comments