दि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्गिस्ट् असोसिएशन व स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व फार्मसी पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने आमदार श्री जगन्नाथ शिंदें चषक राज्यस्तरीय निवड बुद्धीबळ स्पर्धेचे प्रयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ५००००रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार असून ४० खेळाडूंना चषक ही प्रदान करण्यात येणार आहेत.
२ जून ते ५ जून २०१९ या कालावधीत आमदार जगन्नाथ शिंदे चषक निवड बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन
ऑल मराठी चेस असोसिएशनचे वतीने व ऑल इंडीया चेस फेडरेशन चे मान्यतेने होणाऱ् आहे आंतरराष्ट्रीय गुणांकन असणारी ही स्पर्धा स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व फार्मसी, पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
तेथेच खेळाडूंना निवासाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे
ही स्पर्धा सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन च्या सहकार्याने संपन्न होणार आहे
१/१/२००४ नंतर व महाराष्ट्रात जन्मलेल्या पंधरा वर्षाखालील
वयोगटाच्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
या स्पर्धेतुन निवड झालेल्या ४ मुले व ४ मुलींची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे निवड झालेल्या ८ खेळाडूंना प्रत्येकी ५०००₹ देऊन गौरविण्यात येणार आहे
तरी या स्पर्धेत जास्तीजास्त खेळाडूंनी भाग घेऊन ही स्पर्धा संपन्न करावी व नावनोंदणी साठी शरद नाईक सचिव सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांचेशी ९४२३३३७३४६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे विश्वस्त डॉ बी पी रोंगे सर ,दादासाहेब रोंगे, महाराष्ट्र केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशनचे विश्वस्त व उपाध्यक्ष
अरुण बरकसे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, , सचिव अनिल नावंदर,खजिनदार वैजनाथ जागुस्टे,संघटक सचिव श्रो मदन भाऊ पाटील सहसचिव प्रसाद दानवे,तसेच
सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अर्जुन कदम राजू रजपूत नीता तांबोळकर मधुकर नाईक,शिरीष नाईक,शैलेंद्र नाईक यांनी केले आहे.
सोलापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे तसेच या संघटनेचे सचिव राजशेखर बारोळे खजिनदार राजेश विरपे
संघटक सचिव श्री प्रशांत खलिपे पंढरपूर ता, के, अँड ड्र, असो चे महादेव जाधव विठु राहिरकर व सर्व पदाधिकारी व मित्र परिवार व स्वेरी चे श्री विकी मोरे सर हे या स्पर्धा यशस्वी होण्याकरता विशेष परिश्रम घेत आहेत.
या पत्रकार परिषदेत श्री दादासाहेब रोंगे,डॉ विश्वास मोरे , बसवराज मनुरे ,राजशेखर बारोळे ,शरद नाईक, प्रशांत खलीपे, भट्टड शेटजी, विकी मोरे,विठु राहिरकर, शिवराज पाटील दिलीप कारंडे ,उमेश गायकवाड, दादा सरडे व पत्रकार बंधू उपस्थित होते.





0 Comments