लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काल त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. महाडिक यांचे कार्यकर्ते भाजपा प्रवेशाबाबत दबाव आणत आहेत, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव केला. उल्लेखनीय म्हणजे, धनंजय महाडिक यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ३३,५४२ मतांनी पराभव केला होता.
परंतु, कोल्हापुरात आघाडीत-बिघाडी झाली... आणि काँग्रेसच्या सतेज पाटलांनी युतीचे उमेदवार असलेल्या संजय मंडलिकांचा प्रचार सुरू केला. याच धर्तीवर पाटील समर्थकांनी 'आमचं ठरलंय' ही मोहीमही सुरू केली होती. ही मोहीम लोकसभा निवडणुकीच्या काळात चांगलीच गाजली... आणि त्याचा परिणामही लोकसभा निकालात दिसून आला.





0 Comments