पंढरपूर (संतोष हलकुडे)- आंतरराष्ट्रीय स्तरावर सायन्स ऑलम्पियड अँड ब्रिटिश कौन्सिल तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यांना २४ सुवर्ण पदक ,२४ रजत पदक व २४ कांस्य पदक असे मिळून एकूण विद्यार्थ्यांनी ७२ पदके प्राप्त केले असून याशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नवी दिल्ली येथील सायन्स ओलंपियाड फाऊंडेशन अँड ब्रिटिश कौन्सिलतर्फे स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. जवळपास २२ देशाच्या या शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग होताना दरवर्षी इयत्ता १ ली ते १० पर्यंत गटवार या परीक्षा घेतल्या जातात. कासेगाव सारख्या ग्रामीण भागात लोट्स इंग्लिश स्कूलची स्थापना झाल्यापासून तेथील विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेऊन परिश्रम करून विविध पुरस्कार मिळवित असताना प्रत्येक विद्यार्थी सर्व गुण संपन्न कसा होईल? याकडे व्यवस्थापन,प्राचार्या व शिक्षकवर्ग विशेष लक्ष देत असल्याचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवरून जाणवते. याचेच उदाहरण म्हणजे या स्पर्धा परीक्षेत तब्बल ७२ पदकांची लायलूट विद्यार्थ्यांनी केली.

सुवर्ण पदक, प्रेमकुमार गायकवाड जीके ऑलंपियाड सुवर्ण पदक , वेदांत मोरे सायन्स ऑलंपियाड सुवर्ण पदक, मयुरेश बागल जी.के.ऑलंपियाड सुवर्ण पदक,युवराज हजारे सायन्स ऑलंपियाड सुवर्ण पदक, नेहा डुबल सायन्स ऑलंपियाड सुवर्ण पदक,तृप्ती डुबल जी.के. ऑलंपियाड सुवर्ण पदक, संध्या लेंडवे मॅथेमॅटिक्स ऑलंपियाड सुवर्ण पदक, जान्हवी माळी इंग्लिश ऑलंपियाड सुवर्ण पदक,वैष्णवी नागणे इंग्लिश ऑलंपियाड सुवर्ण पदक, प्रणाली पवार इंग्लिश ऑलंपियाड सुवर्ण पदक, सई शिंदे सायबर ऑलंपियाड सुवर्ण पदक, कुंजल मणियार मॅथेमॅटिक्स ऑलंपियाड सुवर्ण पदक, श्रावणी वाडदेकर इंग्लिश ऑलंपियाड सुवर्ण पदक असे मिळून लोटस इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ७२ पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये २४ सुवर्ण २४ रजत २४ कांस्य पदकांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना लोटसच्या प्राचार्या व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले असून यशस्वितांचे संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी. डी. रोंगे, उपाध्यक्ष एच. एम. बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे, इतर पदाधिकारी,विश्वस्त, प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.
छायाचित्र- आंतरराष्ट्रीय स्तरावर सायन्स ऑलम्पियड अँड ब्रिटिश कौन्सिल तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतील लोट्स इंग्लिश स्कूलचे यशस्वी विद्यार्थी अनुक्रमे वरील बाजूस सार्थक देशमाने, प्रेमकुमार गायकवाड, वेदांत मोरे, मयुरेश बागल, युवराज हजारे, नेहा डुबल व तृप्ती डुबल तर खालील बाजूस अनुक्रमे संध्या लेंडवे,जान्हवी माळी,वैष्णवी नागणे,प्रणाली पवार,सई शिंदे, कुंजल मणियार व श्रावणी वाडदेकर.



0 Comments