सांगोला -महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्यावतीने कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे यांना केलेल्या कार्याचा गौरव म्हणून नुकताच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला .सदर पुरस्काराचे वितरण शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्याहस्ते पंढरपूर येथे ५ मे २०१९ रोजी होणार आहे ,या पुरस्काराबद्दल संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम ,सचिव प्रा निळकंठ शिंदे सर यांचेसह संस्थेचे पदाधिकारी व सर्व शिक्षयानी यांनी कौतुक केले आहे .या पुरस्काराचे त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे .




0 Comments