भाळवणी ता.मंगळवेढा येथील सागर फायर या फटाक्याच्या कारखान्यात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी काम सुरु झाले नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.
हा स्फोट झाल्याने जवळच्या अनेक घराला तडे गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारखान्यात कामकाज सुरु झाले नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. गेल्या वेळेसही स्फोट झाला त्यावेळी सोमवारचा आठवडा बाजार असल्याने कामगार बाजारासाठी गेले होते त्यामुळे अनेक कामगारांचा जीव वाचला होता. स्फोट झाल्याने तब्बल तीस किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज आला असल्याची चर्चा आहे. यावरुन या स्फोटाची तीव्रता लक्षात येते.





0 Comments