वरील बाजूस डावीकडून- प्रविण रोंगे, इच्छाश्री देसाई, आयान शेख, उत्कर्षा गायकवाड तर
खालील बाजूस डावीकडून- ऋतुजा शिंदे, राजनंदनी पाटील, तृप्ती चव्हाण, रोहित मनुरकर.
पंढरपूर- कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलच्या सी.बी.एस.ई च्या मार्च २०१९ या परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला आहे. त्यामध्ये १०वीमध्ये प्रविण रोंगेयाने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, इच्छाश्री देसाई ९० टक्के गुण मिळवून द्वितीय आली तसेच आयान शेख ८९.४० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. याच बरोबर उत्कर्षा गायकवाड ८६.६० टक्के,ऋतुजा शिंदे ८४.८० टक्के , राजनंदनी पाटील ८४.८० टक्के, तृप्ती चव्हाण ८३.४० टक्के, रोहित मनुरकर ८४ टक्के ,ओम अवस्थी ८२.५६ टक्के, या सर्वांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. अशी माहिती शाळेच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली.

शाळेत घेण्यात आलेल्या प्रॅक्टिस स्टेशन, अभ्यासक्रमाचे नियोजन, सराव परीक्षा, विद्यार्थी विकास कार्यक्रम, नाईट स्टडीचे नियोजन, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन बद्ध वेळापत्रक, शिस्त, आणि संस्थापक डॉ. बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या ‘पंढरपूर पॅटर्न सेकंडरी स्कूल एज्युकेशन’ आदी उपक्रमामुळे शाळेचा उत्कृष्ट निकाल लागला. इयत्ता दहावीची यंदाची दुसरी बॅच असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्व पालकांच्या मनात उत्सुकता होती. स्वेरीच्या यशाप्रमाणेच स्वाईप तथा श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल उत्कृष्टपणे प्रगती पथावर आहे. असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे. संस्थेचेसंस्थापक डॉ.बी.पी रोंगे, अध्यक्ष बी.डी रोंगे, उपाध्यक्ष एच.एम बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे, तसेच व्यवस्थापनातील पदाधिकारी , विश्वस्त, प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण, वर्गशिक्षक संतोष गाढवे, सहशिक्षक सचिन निकम, जान्हवी दीक्षित, किरण कोडक, भाग्यश्री मठपती, दादासाहेब पटेल, संपत लवटे, ज्ञानेश्वर वायदंडे आदी शिक्षक व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




0 Comments