प्रतिनिधी/पंढरपुर
पंढरपुर येथील निर्माता व दिगदर्शक सचिन धोत्रे,सतनाम फिल्मस निर्मित "परकिया" या चित्रपटाच्या टिमचा सत्कार आमदार श्री.भारतनाना भालके यांनी केला.यावेळी दिगदर्शक सचिन धोत्रे,नायक चेतनकुमार लमाण,नायिका रूचिका शिवशरण,संजय बंदपट्टे,महादेव धोत्रे,सुधिर धोत्रे,सोमा धोत्रे,अमोल बंदपट्टे आदी उपस्थित होते.आपल्या ग्रामीण भागातील तरूण कलावंताना योग्य दिशा देण्याचे काम सचिन धोत्रे यांनी केले.त्याचबरोबर आपल्या भागातील तरूण चित्रपट निर्मिती मध्ये यशस्वी वाटचाल करताना पाहुन अभिमान वाटत असल्याचे आ.भालके यांनी सांगितले.तसेच "परकिया" चित्रपट मी सुध्दा येत्या १४ जुनला बघणार असुन आपण सर्वांनी बघावा असे आव्हान देखील केले.
उसळत्या प्रेमाचा अदभूत पूर्ण अनुभव असलेला "परकिया"हा मराठी चित्रपट येत्या १४ जुनला प्रदर्शित होणार असल्याची माहीती दिगदर्शक सचिन धोत्रे यांनी दिली.या चित्रपटाची गाणी,ट्रेलर १४ मे पासुन सर्वत्र पहायला मिळणार असल्याचे मार्केंटीग प्रमुख साजिद शेख यांनी सांगितले.पंढरपुर येथील सचिन धोत्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असुन दिगदर्शकाची जबाबदारी देखील त्यांनीच पार पाडली आहे.सचिन धोत्रे यांचा हा पहिलाच चित्रपट निर्मितीचा प्रयत्न आहे.या चित्रपटात नायकाच्या मुख्य भुमिकेत चेतनकुमार लमाण तर नायिकेची भुमिका रूचिका शिवशरण साकारत आहेत. तर सुशांत कोळी,रेखा दहातोंडे,करण अनपट,सुशांत आंबुरे,मयुरी शिंदे,विजय शहाणे,शुभम नवले,रवि शहापुरकर यांनीही भुमिका साकारल्या आहेत.




0 Comments