· ९० टक्के पेक्षा जास्त गुण असणारे २६ विद्यार्थी
पंढरपूर (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०१९-२०१९ मध्ये सी.बी.एस.ई बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी उज्व्वल यश संपादन केले असल्याची माहिती स्कुलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.
यावर्षी दहावीतील कुमारी प्राची खडतरे हिने ९७.४० टक्के गुण मिळवून स्कूल मध्ये प्रथम क्रंमाक, ऊर्जा दोशी ९६.८० टक्के द्वितीय क्रमांक आणि शार्दुल केदार ९५.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून यशस्वी झाले आहेत.
यामध्ये ऊर्जा दोशी हिने इंग्रजी मध्ये ९८ गुण, गणित मध्ये प्राची खडतरे व नेहा गलांडे १०० गुण, विज्ञान मध्ये आर्या पाटील, प्रनोती हेंबाडे व दिग्विजय कोंडूभैरी ९७ गुण, सामाजिक शास्त्र मध्ये प्राची खडतरे १०० गुण, हिन्दी मध्ये अर्पिता वासनिक ९९ गुण या विषयात स्कूल मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात ९० टक्के पेक्षा जास्त गुण असणारे २६ विद्यार्थी, ८० टक्के पेक्षा जास्त असणारे ३६, तर ७० टक्के पेक्षा जास्त असणारे २८ विद्यार्थी आहेत.
सिंहगड पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबिवले जात असल्याने विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकत आहेत. यशस्वी विद्यार्थ्याचे पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर सह सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी अभिनंदन केले.




0 Comments