पंढरपूर युवा मुद्रक संस्थेच्या अध्यक्षपदी दत्ता पाटील तर सचिवपदी रामकृष्ण बीडकर यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीची निवड आज दामाजी मठ येथे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दत्ता पाटील यांची अध्यक्षपदी व सचिवपदी रामकृष्ण बीडकर यांची निवड एकमताने झाली. संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील यांनी गेल्या पाच वर्षात अनेक उपक्रम राबविले. सर्व सभासदाना सोबत घेऊन मुद्रक संस्था सर्व महाराष्ट्रात पोहोचवली.
नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी बबन सुरवसे , खजिनदारपदी श्रीराम रसाळ, सचिवपदी रामकृष्ण बीडकर, सहसचिवपदी मकरंद वैद्य, सहखजिनदारपदी संतोष गोंजारी यांची निवड झाली.
यावेळी सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे काम जोमाने करण्याचे ठरविले. आज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर मुद्रकाचे नाव झाले आहे. असेच कार्य पुढे करू असे आश्वासन अध्यक्ष दत्ता पाटील यांनी दिले.






0 Comments