मोहोळ तालुक्यातील वडदेगांव येथील चारा छावणीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी भेट देवून चारा छावणीची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्यासमवेत प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्यासह सरपंच, ग्रामस्थ व संबधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शनिवारी चारा छावणीला भेट दिली. या चारा छावणीत 364 मोठी व 40 लहान अशी एकूण 404 जनावरे आहेत.यावेळी छावणीत दाखल झालेल्या जनावरांना पुरेसा चारा व पाणी उपलब्ध होतो का याची माहिती घेतली. तसेच जनावरांचे लसीकरण, टँगीग, सीसीटीव्ही यंत्रणा, पशुपालकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, पशुपालक समिती याबाबत माहिती घेतली. तसेच उपलब्ध चारा व वाटप चारा नोंदवहीची तपासणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी छावणीतील पशुपालकांशी संवाद साधला. तसेच त्यांची अस्थेने चौकशी करुन अडअडचणी समजून घेतल्या व त्या अडचणी सोडविण्यासाठी संधितांना आवश्यक त्या सुचना दिल्या. याबाबत पशुपालकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
0 Comments