समाजातील वयोवृद्ध माणसांची कमी झालेली किंमत व त्यांच्या आयुष्याची होत असणारी घुसमट हा विषय घेऊन लघुपटामार्फत तो दाखविला जाणार आहे असे दिग्दर्शक अंकुश यांनी माहिती दिली आहे,
ग्रामीण भागातील सामाजिक विषयावर होत असणारी चित्रपट निर्मिती समाजाला योग्य वळणावर आणणारी आहे , अशाने समाजाला एक नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन यावेळी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.यावेळी प्रा. राजेश पवार ,विशाल ज्वेलर्स चे अनिल भोसले ,आंबे गावचे सरपंच अर्जुन कोळी,स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील,विलास शिंदे ,आण्णामामा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या लघुपटात मुख्य भूमिकेत प्राचार्य उद्धव नाईकनवरे हे असून सहकलाकार म्हणून अविनाश सुर्वे, अमोल कोल्हे,विलास शिंदे, प्राजक्ता शिंदे,दीपक लोकरे,विक्रांत चौधरी, डॉ. प्रसाद अंकुशराव हे चेहरे आहेत.
0 Comments