पंढरपूर- दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मद्रास संचलित डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालय, बिजापूर मधील सन १९९६-९७ मधील विद्यार्थ्यांचा येत्या २८ मे २०१९ रोजी पाकणी (जि.सोलापूर) मध्ये ‘माजी विद्यार्थी मेळावा’ आयोजित केल्याची माहिती विद्यार्थी प्रमुख सुनिल साठे यांनी दिली.
बिजापूर (कर्नाटक) मधील अफजलपुर टक्के येथील डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालयातील सन १९९६-९७ बॅचमधील विद्यार्थ्यांचा येत्या २८ मे (मंगळवार) रोजी सोलापूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाकणी येथील ‘अभिषेक मळा’ या नयनरम्य ठिकाणी आयोजित केले असून याची तयारी अंतिम टप्यात आली असल्याची साठे यांनी सांगितले. मेळाव्याच्या निमित्ताने भारतभर विखुरलेले बी.एड.चे माजी विद्यार्थी एकत्रित येणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हा मेळावा घेण्यात येणार असून यावेळी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा मिळणार आहे. सोशल मीडियामुळे अनेक मित्र संपर्कात आले असून यापूर्वी मागील वर्षी मेळावा घेण्यात आला होता. जुने मित्र मिळाल्यामुळे सर्वजण उत्साहीत आहेत. तरी सन १९९६-९७ मध्ये बिजापूर येथील बी.एड. बॅचमधील राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सुनिल साठे (९९२२८६०४२६), निसार कडेगावकर (९८२२४१३९८६), श्रीदेवी राठोड (९८८००५८४६१) व जगन्नाथ राजमाने (९४२१०८८८८२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





0 Comments