पंढरपूर, दि. 30 :- आषाढी यात्रेत पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. येणाऱ्या भाविकांना पालखी तळावर प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पाहणी केली.
जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी पिराची कुरोली, भंडीशेगांव, वाखरी येथील पालखी तळांची पहाणी केली. यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता श्री. वायदंडे, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. जावळे यांच्यासह सरपंच, ग्रामस्थ व संबधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी पालखी सोहळ्यासमवेत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, पाणी भरण्यासाठी टँकरचे ठिकाण, स्नानगृहे, शौचालय, पिराची कुरोली येथील विश्वस्तांच्या खोल्या आदींची पाहणी करुन माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच अखंडीत वीज पुरवठा करण्याबरोच पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी आवश्यक विद्युतीकरण करण्याच्याही सुचना त्यांनी यावेळी संबधितांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी संबधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामस्थांची चर्चा करुन अडचणी जाणून घेतल्या व त्याबाबतचे आवश्यक निर्देश संबधित विभागाला दिले.





0 Comments