पंढरपूर-
येथील द.ह.कवठेकर ज्युनिअर कॉलेज पंढरपूरच्या विज्ञान शाखेचा निकाल सलग चौथ्याही वर्षी 100 टक्के लागला असून घवघवीत यशाची परंपरा या वर्षीच्या निकालाने कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या एच.एस.सी.परीक्षेचा निकाल जाहीर झाला. द.ह.कवठेकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. त्यामध्ये चि.पवन घाडगे (प्रथम), कु.स्वप्नाली जाधव (द्वितीय) व चि.अक्षय हेटिया (तृतीय) यांनी बारावी परीक्षेत बाजी मारत ज्युनिअर कॉलेजच्या यशात मानाचा तुरा रोवला. या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे मानद सचिव नानासाहेब रत्नपारखी, द.ह.कवठेकर प्रशाला शाळा समितीचे चेअरमन वा.गो.भाळवणकर सर, संस्थेचे सदस्य सं.कृ.कुलकर्णी सर, प्राचार्य प्र.गो.डबीर सर, उपप्राचार्य द.शि.तरळगट्टी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक वि.या.पाटील, प्राध्यापक म.मो.कुलकर्णी, अ.न.देडे, ता.सि.चव्हाण, वि.वि.सहस्त्रबुध्दे, प्रि.वि.शिंदे, एस.आर.राऊळ, सो.भा.राऊत, श्री.स.याळगी, अ.तु.आवताडे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, भागवताचार्य वा.ना.उत्पात, मानद सचिव नानासाहेब रत्नपारखी व मो.चि.पाठक, नितीन रत्नपारखी व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.





0 Comments