मुंबई, ३० मे २०१९: एमजी (मॉरिस गॅरेजेस) मोटर इंडिया ने आज भारतातील आपले बहुप्रतिक्षित पहिले वाहन एमजी हेक्टरची बुकिंग ४ जून २०१९ पासून सुरु होत असल्याची घोषणा केली.
भविष्याचा वेध घेणारी कंपनी असल्याने एमजी आपली वेबसाईट एमजीमोटर.को.इनवर ४ जूनला दुपारी १२ वाजता ऑनलाईन बुकिंग सुरू करणार आहे आणि सुरवातीला भारतातील १२० केंद्रावर सपोर्ट देणार आहे. कारचे निर्माता या वर्षी सप्टेंबरपर्यंत त्यांची क्षमता एकूण २५० केंद्रापर्यंत वाढवण्याचे ध्येय बाळगून आहे. एमजी मोटर लवकरच भारतातील आपल्या ५० केंद्राच्या नेटवर्कला हलोल कारखान्यातून हेक्टरचे वितरण करण्यास प्रारंभ करणार आहे.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी म्हटले की, “नवीन युगातील भारतीय ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यास एमजी हेक्टरला उच्च दर्जाच्या स्थानिक सामग्रीने विकसित केले आहे. ही ५०+ कनेक्टेड वैशिष्ट्ये असलेली भारताची पहिली इंटरनेट कार असल्याने हेक्टर 19 विशेष उत्पादन वैशिष्ट्यांसह सादर केली आहे, ज्यामुळे ती तिच्या गटात नवीन बेंचमार्क बनलेली आहे. ग्राहक लवकरच हेक्टरचा आनंद घेऊ शकतील आणि आम्ही एमजीच्या दुनियेत नवीन ग्राहकांचे स्वागत करण्यास तयार आहोत.”
भारतात बहुप्रतिक्षित ओक्टॅगोनल बॅजचे युग आरंभ करतांना एमजी हेक्टर इंटरनेटद्वारे सुसज्जित होऊन दाखल झाली आहे. पुढील पिढीचे आयस्मार्ट तंत्रज्ञान सुरक्षित, कनेक्टेड आणि मस्तीचा अनुभव प्रदान करण्याचे आश्वासन देत आहे. श्रेणीतील सर्वात मोठी 10.4-इंच एचडी टचस्क्रीन आहे आणि एमजीची विशेष सिग्नेचर डिझाइन क्यु दिलेली आहे, ज्यात प्रसिद्ध स्टार-रायडर ग्रीलचा समावेश आहे. तिचा आकार भौमितीय आकार, क्षैतिज प्रवाह आणि सममितीने डिझाइन केलेला आहे तर हेक्टरच्या अंतर्भागाचे काही भाग आधुनिक नृत्य प्रकारांपासून प्रेरित आहेत.
हेक्टर तिच्या गटात पहिली कार आहे ज्यात प्रतिष्ठित 48-व्होल्ट माइल्ड-हायब्रिड आर्किटेक्चर दिलेले आहे, ज्यामुळे एमजी मोटर भारतातील पहिली मुख्य धारेची कार निर्माता कंपनी बनलेली आहे जिने 48व्होल्ट तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. नवीनतम पर्यावरण अनुकूल इंजिन तंत्रज्ञान 48-व्होल्ट लिथियम-आयन बॅटरीचा वापर ऊर्जेचा संग्रह करण्यास करते आणि गरज भासल्यावर 20 एनएम पर्यंत अतिरिक्त टॉर्क सहाय्य प्रदान करते. तीन मुख्य फंक्शन – इंजिन ऑटो स्टार्ट स्टॉप, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि ई-बूस्ट हे 12% पर्यंत उत्सर्जन कमी करून ड्रायव्हिंगचा अनुभव वृद्धिंगत करतात.





0 Comments