विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘सुल्जर इंडिया’चे अधिकारी वसंत वीरकर सोबत, डिप्लोमाचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. सोमनाथ बागल, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ व इतर.
पंढरपूरः- ‘सुल्जर इंडिया’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित डिप्लोमा इंजीनिअरिंगच्या १० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.
स्वेरीने (पदविका) देखील पदवी अभियांत्रिकीप्रमाणेच गुणवत्ता आणि शिक्षणातील महत्व टिकवून ठेवले आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे १० विद्यार्थ्यांची निवड प्रोसेस प्लांट, डायनॅमिक मिक्सर, कोम्प्रेसर्स या संबंधित क्षेत्राशी निगडीत असलेल्या ‘सुल्जर इंडिया’ कंपनीसाठी करण्यात आली. ‘सुल्जर इंडिया’चे एच.आर. वसंत वीरकर व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील डिप्लोमा इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील दयावान भोसले, अभिजित केमदरणे, धीरज तांबोळी, सुरज चव्हाण, महेश झांबरे, काशिलिंग गेंड, राहुल सरगर, शिवराज चव्हाण, योगेश वसेकर आणि विपुल गडदे या १० विद्यार्थ्यांची कंपनीसाठी निवड झाली आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकी(पदविका)मध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी प्रमाणेच होत आहे. सदर विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. सोमनाथ बागल तसेच पदवी अभियांत्रिकीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, डिप्लोमा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






0 Comments