नग्न छायाचित्र काढुन पतीकडुन छळ... महिला डॉक्टरचा खळबळजनक आरोप


'माझे पती आणि घरातील इतरांनी माझे बेडरुममधील नग्न फोटो काढले असून त्या आधारे ते माझा लैंगि छळ करत आहेत', असा खळबळजनक आरोप एका महिला डॉक्टरने केला आहे. ही महिला डॉक्टर मूळच्या कर्नाटकातील असून ती मुंबईतील वरळी येथे आपल्या पतीसोबत राहत असे. या प्रकारानंतर पीडित महिला डॉक्टर माहेरी परतली आहे. 


सन २०१३ मध्ये या महिला डॉक्टरने रित्विक हेगडे या व्यक्तीशी विवाह केला. पोलिसांनी महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून रित्विक, त्याची आई सुतारिता आणि बहीण तनूश्री यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

कर्नाटकात परतल्यानंतर या पीडित महिला डॉक्टरने बेंगळुरूमधील सदाशिवनगर येथे तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये तिचा विवाह झाल्यानंतर घरातील सर्वांनी तिचा छळ करणे सुरू केले. घरातील सदस्य तिला शिव्या देत असत. तसंच, तिला टोमणेही मारत असत. या नंतर तर पती आणि घरातील इतरांनी माझे नग्न फोटो काढून त्या आधारे ते आपला छळ करत असल्याची या महिला डॉक्टरची तक्रार आहे. 




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments