"परकिया" चित्रपटाचे पोस्टर खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित



कॉमेडी,अॅक्शन व रोमान्सचा भरणा असलेला पंढरपुर येथील निर्माता व दिगदर्शक सचिन धोत्रे,सतनाम फिल्मस निर्मित "परकिया" चित्रपटाचे पोस्टर खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.यावेळी दिगदर्शक सचिन धोत्रे,नायक चेतनकुमार  लमाण,नायिका रूचिका शिवशरण,साजिद शेख,करण अनपट,रविराज पोतदार,राहुल पवार आदी कलाकार उपस्थित होते.



सोमवार पासुन या चित्रपटाचा टिजर पहायला मिळणार असल्याची माहीती मार्केटींग प्रमुख साजिद शेख यांनी दिली.तसेच या चित्रपटाचे चित्रिकरण पंढरपुर,पुणे, उस्मानाबाद,सातारा व रत्नागिरी येथे करण्यात आले.पंढरपुर येथील सचिन धोत्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असुन दिगदर्शकाची जबाबदारी देखील त्यांनीच पार पाडली आहे.सचिन धोत्रे यांचा हा पहिलाच चित्रपट निर्मितीचा प्रयत्न आहे.या चित्रपटात नायकाच्या मुख्य भुमिकेत चेतनकुमार लमाण तर नायिकेची भुमिका रूचिका शिवशरण साकारत आहेत. तर सुशांत कोळी,रेखा दहातोंडे,करण अनपट,सुशांत आंबुरे,मयुरी शिंदे,विजय शहाणे,शुभम नवले,रवि शहापुरकर यांनीही भुमिका साकारल्या आहेत.या चित्रपटाचे लेखन व संवादलेखन नागेश धोत्रे यांनी केले असुन छायाचित्रण रविराज पोतदार यांनी केले आहे. येत्या २४ मेला महाराष्ट्र मध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments