कंपन्यांना पाहिजे तसे अभियंते स्वेरीमुळे मिळतात -एच आर. समीर पाटील
स्वेरीच्या दोघींची ‘ई- इन्फोचीप्स’ कंपनीत इंटरव्युवद्वारे निवड
पंढरपूरः-‘अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा कल मोठमोठ्या औद्योगिक क्षेत्राकडे वळत असून मोठ-मोठ्या पॅकेजमुळे विद्यार्थी कंपनीकडे वळत आहेत असे चित्र दिसत आहे. कंपन्यांना नेमके कसा प्रकारे अभियंते हवे असतात याची जाण स्वेरीला आहे. त्यामुळेच कंपनीसाठी हव्या तशा अभियंत्यांचा पुरवठा स्वेरीतून होत असतो. यामुळेच स्वेरीत अभियंत्यां बरोबरच कंपनीसाठी पूरक अधिकारी, कर्मचारी निर्माण करतात यामुळे कंपनीचे स्वेरीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाढला आहे. शिस्त, इंग्रजी संभाषण, बॉडी लँग्वेज आदी महत्वाच्या बाबींची तयारी स्वेरी उत्तमपणे करून घेते. त्यामुळे स्वेरीचे विद्यार्थी अधिक निवडतात.’ असे प्रतिपादन ई- इन्फोचीप्स कंपनीचे एच आर. समीर पाटील यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात कंपनीसाठी अभियंत्यांची निवड करण्यासाठी ते आले असताना विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी स्वेरीत नित्य राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमावर ते प्रकाश टाकत होते.प्रारंभी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ यांनी ‘ई- इन्फोचीप्स’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीची ओळख करून दिली, तर प्रा. डी.ए. कुंभार यांनी स्वेरीची वाटचाल सांगून आतापर्यंत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर यादी सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या. एच. आर. समीर पाटील व पार्थ वसवदा व त्यांच्या निवड समितीमधील सदस्यांनी निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे पार्वती दगडे व सायली रणवरे या दोघींची ई- इन्फोचीप्स कंपनीसाठी निवड केली. पुढे बोलताना कंपनीचे अधिकारी एच आर, समीर पाटील म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला नेमके कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात. याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.’ सदर विद्यार्थीनींना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, प्रा.एस.व्ही.दर्शने व त्यांच्या स्वतंत्र टीमचे मार्गदर्शन लाभत आहे. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, इतर अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या दोघा विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.
0 Comments