पंढरपूरः- ‘कॉल मी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या एम.बी.ए.च्या १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.
स्वेरीने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए. ची गुणवत्ता आणि महत्व टिकवून ठेवले आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे एम. बी. ए.च्या तब्बल १७ विद्यार्थ्यांची निवड फायनान्स अॅनालिसीस क्षेत्राशी निगडीत असलेल्या ‘कॉल मी’ कंपनीसाठी करण्यात आली. ‘कॉल मी’चे एच.आर. प्रशन मगदूम व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली.
त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून एम.बी.ए.च्या अंतिम वर्षातील विद्या सरोदे, सोनम वाघमारे, पूजा हिप्परकर, लक्ष्मी घोंगडे, राणी गडदे, सोनाली शिंदे, स्नेहल शिंदे, शीतल दिक्षित, प्रमोद माळी, वैभव साळुंखे, महेश पाटील, प्रकाश माळी, श्रीकांत पवार, गणेश आसबे, आकाश पवार, किरण मोरे व सना शेख या १७ विद्यार्थ्यांची कंपनीसाठी निवड झाली आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण अधिक तीव्रगतीने वाढत आहे. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले करिअर घडवीत आहेत. ‘मागणी तसा पुरवठा’या तत्वाप्रमाणे संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ, प्रा. डी.ए. कुंभार व प्रा.एस.व्ही.दर्शने आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या१७ विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




0 Comments