इंफिनिक्सने ३२ एमपी सेल्फी कॅमेरायुक्त ‘एस४’ केला लॉन्च ~ १२०° वाईड अॅंगल लेन्ससह ट्रिपल कॅमेरा ~

ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सने आज भारतीय बाजारात 'एस४' हा ३२ एमपी सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन लॉन्च केला. याप्रसंगी इन्फिनिक्स मोबिलिटी (ग्लोबल) चे मॅनिजिंग डायरेक्टर श्री. बेंजामीन जियांग आणि इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिश कपूर उपस्थित होते. दहा हजार रुपयांच्या श्रेणीत उपलब्ध एस४ मध्ये १२०° वाईड अॅंगल लेन्ससह एक १३ एमपी +२ एमपी +८ एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आहे. एस४ मध्ये एआयसक्षम एज डिटेक्शन, प्रोसेसिंग आणि ब्युटिफिकेशन सुविधा उपलब्ध आहे. 

~ एस४ मध्ये आहे एआयसक्षम एज डिटेक्शन, प्रोसेसिंग आणि ब्युटिफिकेशन ~
मुंबई, २१ मे २०१९: ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सने आज भारतीय बाजारात 'एस४' हा ३२ एमपी सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन लॉन्च केला. दहा हजार रुपयांच्या श्रेणीत उपलब्ध एस४  हा या वर्गातला असा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात ३२ एमपी सेल्फी कॅमेरा आणि वाइड अॅंगल लेन्स सहित एक १३ एमपी +२ एमपी +८ एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आहे. याच्या फ्रंट कॅमे-यामध्ये या वर्गातील सर्वात मोठा सेल्फी कॅमेरा सेन्सर साइझ आहे शिवाय यात एआय सक्षम ऑटो सीन डिटेक्शन आणि ब्युटिफिकेशन तर आहेच. हा फोन सध्या नेब्युला ब्लू, ट्वायलाइट पर्पल आणि स्पेस ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहे. एस४ ३+३२ जीबी प्रकारात उपलब्ध आहे, ज्यात ३-इन-वन कार्ड स्लॉट आहे, जे २५६ जीबी पर्यंतच्या डेडिकेटेड मायक्रो एसडीकार्डला सपोर्ट करते.



आधुनिक आणि नव्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने एस४ चा सेल्फी कॅमेरा अचूक प्रतिमा देतो. एस४चे पोर्ट्रेट सेल्फी फीचर एआयचा उपयोग करून चित्रातील विषयवस्तू ओळखून ती हायलाइट करते, ज्यामुळे चित्राचा दर्जा सुबक, स्पष्ट आणि अद्भुत असतो. हा कॅमेरा एफ2.0 अॅपर्चर आणि स्क्रीन फ्लॅशमार्फत उत्तम अशी लो-लाइट सेल्फी काढू शकतो.
एस४ मध्ये मोठी ६.२१” एचडी+ ड्रॉप नॉच स्क्रीन असून त्याचा आस्पेक्ट रेशो १९.५:९ आहे, ज्यामुळे स्क्रीनच्या अगदी टोकापर्यंत पोहोचता येते. एस४  हा संपूर्णपणे परफॉर्मन्स-केंद्रित फोन आहे, जो आजच्या स्मार्टफोन यूझर्सच्या मल्टी-टास्किंग आणि जादा उपयोगाच्या गरजा भागावतो. तो अँड्रॉइड पाय ९.० द्वारा संचालित आणि एक्सओएस ५.० चीता ओएस लेअरद्वारा बूस्टेड फोन आहे. एक्सओएस ५.० मुळे ‘इन्फिनिक्स’ अनुभव आगळावेगळा ठरतो, जो जलद आणि स्वाभाविक यूझर अनुभव देतो. ४००० एमएएच बॅटरी, एआय-सक्षम स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट आणि १२ एनएम हेलिओ पी २२ २.० गिगहर्ट्झ ऑक्टा-कोर प्रोसेसर हे मिळून स्मूद परफॉर्मन्सची हमी देतात.
इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिश कपूर म्हणाले, “विविध गरजा भागवणा-या उत्पादनांची श्रेणी लॉन्च करून भारतीय बाजारपेठेत आक्रमक विस्तार करण्याचे इन्फिनिक्सचे लक्ष्य आहे. स्मार्ट ३ प्लस प्रमाणेच एस४  देखील आजच्या युगाच्या तरुणाला भावेल असा आणि स्मार्टफोनचा दररोज खूप वापर करणार्याजच्या गरजा भागवेल असा आहे. याचा ३२ एमपी सेल्फी कॅमेरा आमच्या यूझर्सचा सोशल मीडिया अनुभव समृद्ध करेल आणि उत्कृष्ट फोटो, आकर्षक अनुभव आणि आठवणी शेअर करण्यातील सुलभता देतील, जे करणे या किंमतीत पूर्वी उपलब्ध नव्हते. एस४चे कॅमेरा फ्रेमवर्क या वर्गात सर्वोत्कृष्ट आहे. आणि त्याच्या परफॉर्मन्स क्षमता, युआय आणि शैलीदार घटकामुळे तो अधिकच आकर्षक ठरतो. टेक-प्रेरित प्रीमियम अनुभव सार्वत्रिक करणे आणि देशातील अधिक विस्तृत वर्गापर्यंत हा अनुभव उपलब्ध करून देणे हेच आमचे लक्ष्य आहे.'




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments