कष्टाची तयारी ठेवा यश तुमचेच आहे -सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे


श्री विठ्ठल अभियांत्रिकीत ‘प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन मेळाव्या’त विद्यार्थी व पालकाना मार्गदर्शन करताना श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, समोर उपस्थित विद्यार्थी व पालकांचा जनसमुदाय.
श्री विठ्ठल अभियांत्रिकीतील प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन मेळाव्याला जवळपास  ७०० जणांची उपस्थिती
पंढरपूरः- ‘जे काम करिअर करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे, हिताचे आणि फायद्याचे आहे त्याच कामांना सर्वप्रथम प्राधान्य द्या. भले त्या कामात आवड असो वा नसो. आपला पाल्य १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर खरी चिंता पालकांना पडते ती आपल्या पाल्यांच्या चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशाची स्पर्धेच्या युगात महाविद्यालय निवडताना पालकांची व विद्यार्थ्यांची तारांबळ उडते, त्यासाठी संपूर्ण अभ्यास करून महाविद्यालय निवडावे. त्यासाठी त्या महाविद्यालयाचे इंफ्रा स्ट्रक्चर, उच्चशिक्षित प्राध्यापकांची संख्या आणि संस्कृती विचारात घेतल्यास फसगत होणार नाही. त्यासाठी विद्यार्थी व पालकांनी पदवी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरताना अभ्यास करावा.’असे आवाहन श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.
    

 गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन मेळावा’ यावर आयोजिलेल्या मेळाव्यात अथांग पसरलेल्या विद्यार्थी व पालकांसमोर संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे प्रमुख मार्गदर्शन करत होते. पालक प्रतिनिधी म्हणून औदुंबर पाटील (सौ.सुगंधाताई पाटील महाविद्यालय,कुर्डूवाडी), विजय पाटील (दर्लिंग विद्यालय, चळे) हे तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. कुसुमताई गायकवाड व सौ. अनिताताई शिंदे ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रास्तविकात अभियांत्रिकी प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे यांनी अभियांत्रिकीसाठी प्रवेशाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता का आहे हे पटवून सांगून ‘ मी स्वतः १९९८ पासून स्वेरीमध्ये कार्यरत असून रोंगे सरांच्या बहुमोल व दिशादर्शक मार्गदर्शनाखाली , प्रत्येक शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेवून स्वेरीला एका उंचीवर नेवून ठेवले आहे व स्वेरीच्या प्रत्येक यशाचा साक्षीदार आहे.’असे सांगून प्रथम वर्षाची प्रवेश संख्या, वार्षिक निकाल आणि प्लेसमेंट मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मधून आघाडीवर असल्याचे स्पष्ठ केले. सोलापूर येथील रात्र शाळेचे प्राचार्य डॉ. अनिल बारबोले म्हणाले की, ‘जे श्रमातून उभे राहते ते कधीही ढासळत नाही. यासाठी स्वेरीच्या कॅम्पसमधील परिश्रम आणि शिस्तीचे मानकरी व्हा. पूर्वी ‘पंढरपूर पॅटर्न’साठी ओळखली जाणारी स्वेरी आता रोंगे सरांच्या नव-नवीन शैक्षणिक उपक्रम व विक्रमामुळे ‘रोंगे पॅटर्न’ म्हणून ओळखली जात आहे. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार म्हणाले की, ‘येथील संशोधन वातातावरणामुळेच स्वेरीला जवळपास रु. ७ कोटींपर्यंतचा निधी प्राप्त झाला असून संशोधन संस्कृती रुजत आहे.’ असे सांगून आपला शैक्षणिक जीवनातला अनुभव सांगितला. पुढे मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. रोंगे म्हणालेकरिअर चांगले होत असेल तर महाविद्यालयाच्या‘फी’ला फारसे महत्व देवू नका. बदललेल्या नियमावलीतून नेमके अचूक महाविद्यालय व योग्य ब्रँच (विभाग) निवडताना मानसिक गोंधळ उडतो. यासाठी अभ्यासपूर्ण व काळजीनेच ऑप्शन फॉर्म भरावेत. प्रवेश प्रक्रियाचॉईस कोड क्रमांकविविध ब्रंचेस हे विद्यार्थी व पालकांनी अगोदरच शहानिशा करून एकमताने निश्चित करावेत. त्याचबरोबर प्रवेशावेळी गरजेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखलाजातपडताळणी प्रमाणपत्र, १२ वी, सी.ई.टी. आदी सबंधित गुणपत्रिका व कागदपत्रांची छाननी व तपासणी होवून अंतिम अर्ज नोंदणी होते. विविध कॅप राऊंडच्या माध्यमातून ’महाविद्यालय निवडताना त्या                                                                                                                              
महाविद्यालयात पाठीमागील वर्षात किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, त्याचा शिक्षण दर्जा, निकाल, प्लेसमेंट, या बाबी तपासून पहाव्यात. प्रवेश अर्ज नोंदणीनंतर मिळणारे युजर नेम व पासवर्ड इतर कोणालाही देवू नये.’ असे सांगून कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीस लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, महाविद्यालयाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा, वसतिगृह व्यवस्था, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग यांची उपलब्धता, वार्षीक निकालाची टक्केवारी, या महत्वाच्या बाबींवर विद्यार्थी व पालकांनी जागरूक राहावे’ असे आवाहनही केले. पालक प्रतिनिधी विजय पाटील यांनी’स्वेरीच्या शिक्षण पद्धतीमुळे ग्रामीण भागातील व आता शहरी भागातील सुद्धा विद्यार्थ्यांचा कल स्वेरीकडे राहिला आहे.’ असे सांगितले. एन.बी.ए. मानांकनापासून ते शैक्षणिक फी, एज्युकेशन लोन, विद्यार्थ्यांच्या हीताच्या सुविधा बाबत प्राचार्य डॉ रोंगे यांनी मार्गदर्शन केले. सौ. जाधव म्हणाल्या की, ‘रोंगे सरांचे प्रत्येक परिश्रम मी जवळून पहिले असून विद्यार्थ्यांसाठी त्यांचे योगदान लाख मोलाचे आहे. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. हेच सांगावेसे वाटते.’ यावेळी स्वेरी कॅम्पस इन्चार्ज व वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम.एम.पवार, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.एम.के.राऊळ, सर्व अधिष्ठाता व विभागांचे विभागप्रमुखप्राध्यापक वर्ग व सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील जवळपास ७०० हून अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नीता कुलकर्णी यांनी केले तर डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी आभार मानले .
मेळाव्यातील क्षणचित्रे-
१. विद्यार्थी व पालकानी तहानभूक विसरून स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे मार्गदर्शन ऐकत होते.  
२. सकाळी १०.१५ वाजता सुरु झालेले मार्गदर्शन मेळावा दुपारी ३.०० वाजेपर्यंत चालला.
३. पालकांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल, कॅम्पस प्लेसमेंट, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग व उपलब्ध
    सुविधा या विषयी अधिक जाणून घेतले.
४. राष्ट्रीकृत बँकांकडून शैक्षणिक कर्जाच्या सुविधा उपलब्ध असून त्याची माहिती या मेळाव्यातून विद्यार्थी
   व पालकांना मिळाली.




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments