पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन माजी आमदार तसेच पांडुरंग सह.सा.का.चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, माजी नगराध्यक्ष पांडुरंग घंटी व माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास बांधकाम समिती सभापती सुजितकुमार सर्वगोड, माजी नगरसेविका कमलताई तोंडे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, विवेक परदेशी, मालोजी शेंबडे, डी.राज.सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते इब्राहीम बोहरी, अमोल डोके, धर्मराज घोडके व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल जोशी, कर्मचारी भिवाजी वाघमारे, भारत बाबर, हनुमंत वाघमारे, बळी यादव, सुरेश लोखंडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार माजी आमदार तसेच पांडुरंग सह.सा.का.चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांची पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चॅरेटेबल ट्र्स्ट इंदौर, मध्यप्रदेश या संस्थेवर संचालक पदी नियुक्ती झाल्याने माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.




0 Comments