पंढरपुर सिंहगडच्या ४ विद्यार्थ्याची सीमेन्स कंपनीत निवड


      पंढरपुर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या सीमेन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीत सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
      भारतात सुमारे ९० वर्षे सीमेन्स उदयोन्मुख भारताच्या विकासाशी संबंधित आहेत. भारताच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणेसंपूर्ण आरोग्यसेवेकरिता रुग्णांना ऊर्जानिर्मिती करणे किंवा रुग्णालये सशक्तीकरण करणेभारतासाठी एक टिकाऊ भविष्य घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेमध्ये सीमेन्सने जागतिक दर्जाची तंत्रज्ञानाची आणि पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. त्यांच्या उत्पादनांच्या आणि समाधानाद्वारेभारतातील सीमेन्सने लाखो भारतीय नागरिकांचे जीवन प्रभावित केले आहे. अशा या कंपनीत पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सचिता जाधव, ऐश्वर्या चौधरी, इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील सुषमा घोडके, शर्वरी दिवेकर आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली आहे.  सीमेन्स या नामांकित कंपनीत पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सोलापूर जिल्हातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सिंहगड महाविद्यालयात कुशलअनुभवी व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग असून या प्राध्यापकांच्या ज्ञानाचा फायदा सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन शिक्षण देणारे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आज अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर ठरत आहे. सीमेन्स या कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. नामदेव सावंतप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा. प्रवीण कलूबर्मे, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. सुर्यकांत पाटील आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments