पंढरपूर -पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी सहकारी पत संस्था नं. एक मर्यादित, पंढरपूरच्या कार्यालयात नगरपालिका कामगार संघटना (इंटक)चे अध्यक्ष महादेव आदापूरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष नाना वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये संस्थेचे चेअरमनपदी संस्थेचे संचालक जयंत मधुकर पवार यांची तर व्हा.चेअरमनपदी विनायक महादेव भांगे तसेच सेक्रेटरीपदी सौ राणी मधुकर गायकवाड, महिला राखीव संचालकपदी लक्ष्मी पांडुरंग हुंडेकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी चेअरमन सुनिल भिमराव वाळुंजकर ,माजी सेक्रेटरी प्रीतम येळे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
नूतन चेअरमन जयंत पवार यांनी सत्कार प्रसंगी सर्वांनी संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे सांगितले.
कामगार संघटना अध्यक्ष महादेव अदापुरे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल व सर्व संचालक मंडळ संस्थेचे कारभार मिळून एकोप्याने करतात याबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे संचालक सुनील वाळुंजकर, सुनील सोनार, शरद वाघमारे, प्रीतम येळे,अनिल अभंगराव ,तानाजी अधटराव, दिनेश साठे, धनंजय वाघमारे तसेच सर्व सभासद उपस्थित होते. शेवटी माजी सेक्रेटरी प्रीतम येळे यांनी आभार मानले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




0 Comments