कौटुंबिक हिंसाचार कायद्यातंर्गत महिलांना संरक्षणाचीही तरतूद- दिवाणी न्यायाधीश आर.ए.सासने



   पंढरपूर दि. 26 :-  कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा अतंर्गत महिलांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक अत्याचाराबाबत दाद मागण्याची मुभा आहे. महिलांवर कौटूंबिक अत्याचार झाल्यास अशा महिलांना कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दादच नाही संरक्षणही  मागता येत असल्याचे  दिवाणी न्यायाधीश आर.ए.सासने यांनी सांगितले.
शेतकी भवन ,पंचायत समिती पंढरपूर येथे  कौटुंबिक हिंसाचार कायदा विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे, बार असोसिएशनचे अध्यक्ष भगवानराव मुळे, सेक्रेटरी राहुल बोडके, विधिज्ञ संदीप सुरवसे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.


कुटूंबातील महिलांना  पत्नी म्हणून जे अधिकार व सुविधा दिल्या जातात त्यापासून वंचित ठेवल्यास महिलांना या कायद्यातंर्गत दाद मागता येते. तसेच अत्याचारग्रस्त महिलांना निवासाची सोय व पोटगीबाबतही दाद मागता येते , असे  दिवाणी न्यायाधीश आर.ए सासने  यांनी सांगितले.
एकाच घरात राहणारे पुरुष नातेवाईक तसेच  इतर रक्ताचे नातेवाईक यांचेकडून स्त्रीचा छळ, दररोज लागणाऱ्या गरजांपासूण वंचित ठेवणे, हुंड्याच्या मागणीवरुन धमकावणे, मारहाण व  शिवीगाळ करीत असतील तर स्त्रीला संरक्षण अधिकारी अथवा पोलिस  किंवा सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थाकडे तक्रारी अर्ज देता येतो. असेही  दिवाणी न्यायाधीश आर.ए सासने  यांनी मार्गदर्शन  करताना सांगितले.
यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विलास शेळके यांनी महिलासाठी कौटुंबिक हिंसाचार प्रतिंबधक कायद्यातंर्गत असलेल्या तरतूदींची माहिती देवून मार्गदर्शन केले.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments