सोलापूर येथील पत्रकारिता क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते अजयकुमार खांडेकर यांची सोलापूर जिल्हा मुख्य समन्वयक पदी तर पंढरपूर चे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शिंदे यांची उपसमन्वयक म्हणून निवड करण्यात आली. खांडेकर यांचे कार्यक्षेत्र सोलापूर जिल्हाभर विविध संघटनेमधून पसरले असून मुख्य समन्वयक पदाच्या निमित्ताने सोलापूर मध्ये त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारणार आहे. या क्षेत्रातून कार्यकर्ते खांडेकर यांची रूग्ण हक्क परिषदेच्या सोलापूर जिल्हा मुख्य समन्वयकपदी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी नियुक्ती केली. पुण्यात प्रदेश मुख्य कार्यालयामध्ये नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित सोलापूर मुख्य समन्वयक खांडेकर म्हणाले की मुख्य समन्वयक पदाची जबाबदारी मोठी आहे, सर्व जिल्ह्यातील पदाधिकार्यांना सामावून घेऊन जास्तीत जास्त शाखा निर्माण करून कार्यकर्त्यांना बळ देणार आहे. संघटनेत लोक जोडण्याचे काम करून गरजू रूग्णांना दवाखान्याचे लाभ व त्यांचे हक्क मिळवून देणार व तसेच रूग्ण हक्क कायदा झालाच पाहिजे यावर त्यांनी आवाज उठविला.
प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी निवडीसाठी समाधान व्यक्त केले. काम करण्यार्या,व रिझल्ट देणार्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभारणार आहे. असे ते म्हणाले. यावेळी रूग्ण हक्क परिषद संस्थापक वैशालीताई चांदणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण, पुणे उपाध्यक्ष शाम डिसुजा, सोलापूर समन्वय श्रीमंत शिंदे, प्रशांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.





0 Comments