उर्मिला कोळेकर यांची कारवाई करण्याची मागणी
मंगळवेढा/प्रतिनिधी
पाटखळ ता. मंगळवेढा येथील ग्रामपंचायत सदस्या शोभा धर्मराज मोरे यांचे पती धर्मराज मोरे यांनी पाटकळ येथील व्यापारी संकुल गाळा नंबर 19 मध्ये दुकान असून त्यांनी ग्रामपंचायतला न सांगता व ग्रामपंचायत कोणतीही परवानगी न घेता गाळ्याच्या पाठीमागील भिंत पाडून बेकायदेशीर रित्या गावठाण जागेवर अतिक्रमण केले आहे त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांनी त्यांच्या पत्नीचा सदस्य पदाचा दुरुपयोग करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांची सदस्यपद रद्द करण्यात यावी अशा प्रकारची लेखी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा तहसीलदार मंगळवेढा गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाची दखल घेऊन मंगळवेढ्याची गटविकास अधिकारी यांनी याबाबतचा खुलासा करण्यात यावा तात्काळ माहिती पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करण्यात यावी असा लेखी आदेश ग्रामपंचायत पाटकर ग्रामसेवक यांना देण्यात आला आहे काय कारवाई होणार याकडे पाटकळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे यशवंत ग्राम उद्योग व्यापारी संकुल ग्रामपंचायत फटकळ नंबर 19 मध्ये बेकायदेशीर रित्या तोडफोड व सदस्य पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी व सदस्य पदावरून निलंबित करण्यात यावे अशी मागणी उर्मिला संजय कोळेकर यांनी केली आहे
यशवंत ग्राम उद्योग व्यापार संकुल गाळ्यामध्ये ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने अधिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम पाडले त्याची सखोल चौकशी करावी अनेता पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण करणार- उर्मिला संजय कोळेकर पाटकळ ता.मंगळवेढा तक्रारकर्ते
नियमानुसार चौकशी करून कारवाई करणे बाबतचा अहवाल पंचायत समिती स्तरावर पाठवला जाईल- ग्राम विकास अधिकारी अशोक चव्हाण पाटील पाटखळ





0 Comments