स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये 136 जाणणे रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट व झाडे वाटप करण्यात आले. वृक्षारोपन उपक्रमासाठी 150 रोपांचे वाटप करण्यात आले. 11 गरजू लोकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. सांगोला भागातील छावणीत चारा वाटप करण्यात आला. दंताची तपासणी करण्यात आली व विविध क्षेत्रांतील गुणवत्तांना ‘गादेगांव भुषण’ पुरस्कार देण्यात आला.
वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन फाटे यांनी राबविलेल्या या अनोख्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.








0 Comments