पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची २९४ वी जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. दिनकर यादव यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. यशपाल खेडकर म्हणाले की, ‘लोकोत्तर ठरणारे अनेक महान गुण राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्यात होते. होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोचविण्यात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा सिंहाचा वाटा होता.’ असे सांगून होळकर यांच्या संपूर्ण जीवन कार्याची ओळख करून देताना अनेक महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला. यावेळी स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, ग्रंथालय प्रमुख प्रा. एस. एम. बागल, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. करण पाटील, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. एम.एम. अवताडे, प्राध्यापकवर्ग तसेच शिरीष भोसले, नागेश ताडे, भक्ती मोहोळकर, योगेश कदम, मिलिंद कोकणे, बालाजी सुरवसे, डी.बी.बागल, मोरे, इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.





0 Comments