दि. 21 जुन रोजी जागतिक आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने पंढरीत योग-प्राणायाम आणि सुर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 वाजता पंढरीतील तुळशीवृंदावनासमोर हा कार्यक्रम संपन्न झाला. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पंढरीतील अनेक नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. भारत विकास परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments