जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पंढरीत रस्त्यावरील योग साधना सप्ताह व भव्य रॅली





महाराष्ट्र शासनाने आयुष मंत्रालय मुंबई यांनी योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आता बंद हॉल मध्ये योगा न करता रस्त्यावर  योग साधना( yoga happy Street ) )ही थीम  पंढरीत राबविण्यात आली. या माध्यमातून लोकांमध्ये योगा ची आवड निर्माण व्हावी व जास्तीत लोकांनी योगा करून ‘करो योग रहो निरोग’ ही संकल्पना राबवून नागरिकांचे स्वास्थ चांगले ठेवावे म्हणून जनजागृती करण्यात आली.  यासाठी दि 16 ते 21 तारखे पर्यंत ही थीम राबविण्यात  आली. सकाळी 6 ते 30 यावेळेत शिवाजी महाराज चौक , यमाई ट्रॅक, के बी पी कॉलेज चौक, स्वा सावरकर चौक, ठाकरे चौक येथे योग साधना करण्यात आली.

आज दि 21 जून 019 रोजी योग दिनाचे औचित्य साधून शहरातुन भव्य रॅली काढून त्याचा समारोप राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान येथे करून सूर्यनमस्कार व योगा करण्यात आले. पंढरपूर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, विठ्ल रुक्मीणी योग प्राणायाम संस्था , योग विद्याधाम संस्था सर्व योग साधक, संस्थेचे पदाधिकारी हजर होते. कार्यक्रमाची सांगता जिजामाता उद्यान पंढरपुर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले व पंढरीतील अनेक नगरसेवक यांचे उपस्थितीत झाली. योग विद्या धाम चे प्रकल्प संचालक अशोक ननवरे, सुरेश मोहिते ,शाहूराजे जाधव,,गोवर्धन भट्टड विठ्ठल रुक्मिणी  योग प्राणायाम संस्थेचे अध्यक्ष सुनिल वाळूजकर, सचिव प्रशांत आगावणे,उपाध्यक्ष महेश भादुले,चंदूलाल सुपेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या दोन्ही संस्थेचे सदस्यांनी प्रयत्न केले. सदर योगवर्गात योगासने, प्राणायाम व शुध्दीक्रिया शिकविण्यात आल्या. याचा अनेक पंढरपुरकरांनी लाभ घेतला.




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments