पंढरपुर (प्रतिनिधी) बिबॉक्स एआय टेक्नॉलॉजीवर आधारीत डिजिटल एसेट एक्सचेंज आहे जे बिटकॉइन, एथेरियमसारख्या डिजिटल मालमत्तेसाठी सुरक्षित,स्थिर आणि विश्वसनीय विनिमय सेवा प्रदान करते. अशा नामांकित कंपनीत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड महाविद्यालयातील ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटसाठी स्वतंत्र विभाग आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना कंपनीत निवड होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची माहिती दिली जाते. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच जगातील नामवंत असलेल्या कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनल कंपनीत स्वतःचा ठसा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व तयार करून आपले करिअर करीत आहेत.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील चैतन्य पेठकर, सलोनी नदाफ, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील वर्षा मोहिते, ज्योती चौगुले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील कोमल हेंबाडे, प्रतीक्षा धावणे, तनुजा मुजावर आदी विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे.
बिबॉक्स कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महावि द्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.





0 Comments