अहमदनगर – सोलापूर रस्त्यावर रविवारी सकाळी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजण ठार झाले, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात अमोल रामदास गारुडकर (३०), आणि शालन रामदास गारुडकर (५० राहणार घरगाव) हे दोघेजण ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले.
अहमदनगर – सोलापूर रोडवरील वाटेफळ गावाजवळ हा अपघात झाला. पहाटेच्या वेळी सोलापूर महामार्गावर पिकअप गाडी अहमदनगरकडे येत होती. तर दोन कंटेनर अहमदनगरकडून सोलापूरकडे जात होते. वाटेफळ गावाजवळ दोन कंटेनरमध्ये पिकअप गाडी येऊन हा अपघात झाला. पिकअपचा चक्काचूर झाला. गावक-यांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळच्या रूग्णालयात त्यांच्यावर सुरू आहेत. हे सर्वजण श्रीगोंदा घरगाव येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.





0 Comments